in

महावितरणाची वाघीण; लाईटच्या खांबावर चढून करते तारांची जोडणी

Share

महावितरणाचा फिल्ड वर्क म्हटल तर खूपच जोखमीचे काम…विजेच्या खांबावर चढून तारांची जोडणी करणे असते.यामध्ये खांबावर चढून तारा जोडणीच काम सर्वाधिक कर्मचारी हे पुरुषच करतात.मात्र या घटनेत चक्क एक महिला खांबावर चढून विजेची दुरुस्ती करताना दिसतेय.एकंदरीत हा प्रकार काय आहे ते जाणून घेऊयात…

महावितरणाच्या या कामात पुरुषांची मक्तेदारी मोडून महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत हे दाखवून देणाऱ्या उषा जगदाळे यांचा जन्म बीडच्या आष्टी तालुक्यातील शेतकरी कुटुंबात झाला. शालेय जिवनापासूनच उषाच्या अंगी असणाऱ्या मैदानी, खेळाडू वृत्तीची दखल संजय सोले सर यांनी घेत प्रोत्साहन दिले. पुढे माध्यमिक शिक्षणात इयत्ता पाचवीपासून विष्णू आदनाक सरांनी खेळ कौशल्यांची जोपासना करीत विविध स्पर्धांची तयारी केली.

अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीमुळे राष्ट्रीय पातळीवर खो – खो या खेळात उषा यांना तब्बल अकरा सुवर्णपदकं मिळाली आहेत. एवढचं नाहीतर राज्यस्तरीय महाराष्ट्र टीमची कर्णधारपदही उषा यांनी भूषवलं आहे. घरच्या परिस्थितीमुळे उषाला पुढील शिक्षण घेता आलं नाही. विवाहानंतर उषाने पतीच्या खांद्याला खांदा लावत पतीला दुध व्यवसायात मदत केली.यांनतर आपल्या खेळाच्या मेरीटवर 2013 साली महावितरणची जाहीरात निघाली आणि खेळाडू कोट्यातून महावितरणमध्ये ” तंत्रज्ञ ” म्हणून निवड झाली.

दरम्यान महावितरणच्या उपविभाग कार्यालयात काम करताना , एक महिला असूनही कार्यालयीन कामकाज न करता , हे क्षेत्र महिलांसाठी केवळ कार्यालयीन न राहता प्रत्यक्षात खांबावर चढून काम करण्यास प्राधान्य दिलं.यामुळं उषा ह्या स्वतः विजेची तार असलेल्या खांब्यावर चढुन दुरूस्तीचे काम वेळेत करतात.या मागे त्यांचा इतकाच माणस असतो कि, महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत.

आज कोरोनाच्या महामारीत त्या जे काम एखाद्या पुरुषाला लगेच जमणार नाही, असं काम करत असल्याने त्यांची महावितरणच्या वाघीण म्हणून ओळख होत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

भक्तांची आणि देवांची ताटातूट का – राज ठाकरे