in

MPSC Exam Postponed; आम्ही इथेच झोपणार- गोपीचंद पडळकर

एमपीएससी विद्यार्थ्यांची परीक्षेची तारीख उद्याच जाहीर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली. या घोषणेनंतर 14 तारखेलाच परीक्षा घ्यायला हवीच अशी आक्रमक भूमिका भाजपा आमदार गोपीचंद पडकळर यांनी घेत आज आम्ही इथेच झोपणार असल्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला

हे.एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याने विविध जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आंदोलन केली. विरोधकांनी सुद्धा याचं मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. त्यामुळे वाढता दबाव पाहता आता एमपीएससीची परीक्षा येत्या 8 दिवसांत घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच या परीक्षेची तारीख उद्याच जाहीर करणार असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.

मात्र गोपीचंद पडळकर यांनी सरकारने पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली. आमचा सरकारवर विश्वास होता. मात्र आता आम्ही रस्त्यावर उतरले आहोत. माझा आजचा मुक्काम इथेच असेल अशी आक्रमक भूमिका घेतली. तसेच मी राजकारण करत नसल्याचेही प्रत्युत्तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

विद्यार्थी वडापाव खाऊन दिवस काढत आहेत. वर्ष दोन तीव वर्षांपासून तयारी करत आहेत. मुलीपण परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांचे लग्न करायचे बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेची तारीख आजच जाहीर करावी. 14 तारखेलाच परीक्षा घ्यायला हवी. आम्ही इथेच झोपणार असल्याचे पडकळर यांनी सांगितले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Virus : रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार दीड हजार रुपयांपर्यंत! प्रस्ताव सरकारला सादर

MPSC Exam Postponed; गोपीचंद पडळकर, राम सातपुतेंना पोलिसांनी घेतले ताब्यात