in

#MPSC : एमपीएससीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली.. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान या निर्णयामुळे विद्यार्थी आंदोलनाचे अस्त्र उपसण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालत परीक्षेबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. तसेच येत्या 11 एप्रिलला परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यसरकारने कडक निर्बध लावून शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे 11एप्रिल रविवारी होणारी परीक्षा कशी असा प्रश्न उपस्थित होत होता.

अखेर आज दोन दिवस उरले असताना परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता नेमकी परीक्षा कधी होणार असा प्रश्न उभा ठकाला आहे. तर विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी या संदर्भात एक ट्विटही केले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग व विद्यार्थ्यांना संभाव्य धोका लक्षात घेत येत्या ११ तारखेला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी याबाबत अनेक विद्यार्थी व पालकांनी संपर्क करून विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही परीक्षार्थी स्वतः कोरोनाबाधित असल्याचीही माहिती होती. त्यामुळे सरकार एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या विचारात होतीच, त्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ट्विटरवर#MaharashtraNeedsVaccine ट्रेंडिंगमध्ये

लक्ष द्या ! आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन