in

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. अहिल्याबाई शिक्षण मंडळासमोरील रस्त्यावर उतरून विद्यार्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी विद्यार्थांनी घोषणाबाजी देखील केली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करत आहेत, विद्यार्थांसाठी पीपीई कीट द्या ,अशी मागणी करत 14 मार्च ला परीक्षा झाल्याच पाहिजेत असे मत भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC Exam Postponed : MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी आक्रमक

कथित हल्ल्यासंदर्भात उर्मिला मातोंडकर म्हणतात, ममता या ‘बंगालची वाघीण’! भाजपा, काँग्रेसची टीका