in

MPSC Exam Postponed ; एमपीएससीची परीक्षा 8 दिवसांत; तारीख होणार उद्या जाहीर

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याने विविध जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आंदोलन केले. विरोधकांनी सुद्धा याचं मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. त्यामुळे वाढता दबाव पाहता आता एमपीएससीची परीक्षा येत्या 8 दिवसांत घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच या परीक्षेची तारीख उद्याच जाहीर करणार असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक वरुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एमपीएससी परीक्षा संदर्भात मोठी माहिती दिली. एमपीएससी परीक्षांची तारीख उद्या घोषित होणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या 8 दिवसांत परीक्षा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा दिलासा मिळालाय.

जर आठ दिवसात परीक्षा घेणारच आहात तर तर मग उद्याची पुढं का ढकलली यावर मुख्यमंत्री म्हणाले, यामागे कारण कोविडच आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारी यंत्रणाच लागते. त्यात कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतो आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षेसाठी योग्य नियमावली करून परीक्षा घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधक एमपीएससीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरत होते. त्यामुळे परीक्षेवरून विरोधकांनी राजकारण करू नये असे आवाहन ठाकरे यांनी केले. तसेच कुणी भडकवतं आहे म्हणून भडकू नका असे आवाहन त्यांनी जनतेला सुद्धा केले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Corona Virus : रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार दीड हजार रुपयांपर्यंत! प्रस्ताव सरकारला सादर