in

उदयनराजे भोसले यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

प्रशांत जगताप , प्रतिनिधी

साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सातारा जावलीचे सुपुत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची दरे येथे सदिच्छा भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ आणि चर्चेला उधाण आले आहे.

काल राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी जलमंदिर येथे जाऊन खा.उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीतील निष्ठावंतांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं गेलं असून जिल्ह्यात खळबळ उडाली होती. येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये खासदार उदयनराजे धक्कातंत्र वापरणार हे या भेटीतून स्पष्ट दिसत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यवतमाळच्या सुमितने साकारला नारळातून गणपती

‘राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का?’