in

Sanjay Raut | खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण गुलदस्त्यात

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.नेमकी हि भेट कुठल्या मुद्यावर झाली आहे, याचे कारण अद्याप समोर आले नाही आहे. कोरोना संदर्भात भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी खासदार संजय राऊत आले होते. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांची प्रकृती महत्वाची आहे त्याच्यावर उपचार सूरु असल्याने भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राजकीय भेट सुद्धा नव्हती असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच कोरोना स्थितीवर त्यांची भेट घेतल्याचे म्हटले.

दरम्यान राऊत यांनी दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर ते म्हणाले, सर्वच नेत्यांचे असे म्हणणे आहे, संसदेत चर्चा झाली पाहिजे तरच देशाच्या परिस्थितीचे आकलन होईल असेही ते यावेळी म्हणाले.

कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी केली. राऊत यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची पोलिसांत तक्रार

Manmohan Singh;माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण