in

अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर पारधी समाजाचे आंदोलन

रुपेश होले, बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या घराबाहेर पारधी समाजाने आंदोलन करण्यास सूरूवात केली आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे अजित पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

बारामती विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पोलीस पथकाने सोनगाव येथील पारधी वस्तीत सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर काही दिवसांपुर्वी छापेमारी केली होती. त्यावेळी अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची धरपकड करत असताना मंगलेश उर्फ अशोक भोसले याच्या दिशेने पोलीस धावले असता, त्यावेळी घाबरून जाऊन त्याने लगत असलेल्या नीरा नदीच्या पाण्यात उडी मारली. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला अर्धांगवायूचा झटका आलेला होता त्यामुळे त्याला नदी पार करून पोहता आले नाही. यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, वृद्ध झालेल्या व्यक्ती अपंग असून पोलिसांनी मारहाण केल्याने घाबरून पाण्यात उडी मारल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच पोलीस कारवाईसाठी आले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी पारधी समाजाची मागणी आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या घराबाहेर नातेवाईक ठाण मांडला आहे. तसेच अजित पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आमदार महेश लांडगेंचा उद्या वाढदिवस; फलक काढण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे सोलापूर महामार्गावर 5 जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू दोघे जखमी