in

सिंधुदुर्गात डोंगर खचला; आठ घरांचे नुकसान

समीर महाडेश्वर | सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर खचल्याची दुदैवी घटना घडली आहे. कळणे मायनिंग परिसरात ही घटना घडली असून आठ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच डोंगराचा चिखल रस्त्यावर आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचल्याची घटना घडली आहे. भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खाणीत कोसळला. कळणे मायनिंग परिसरात मातीचा काही भाग खचल्यामुळे या ठिकाणच्या ८ ते १० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात एका घराची भिंत कोसळली आहे. तसेच खाणीतील पाणी व चिखली युक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत आलं. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद करण्यात आला आहे. तर रस्त्यावर चिखल व शेतीत चिखलाचं साम्राज्य पसरला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘संदेस’ अ‍ॅपचं लॉन्चिंग!

Weather Alert | पुढचे ५ दिवस ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा