in

Moto G100 स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज

या महिन्याच्या सुरुवातीस, कंपनीने त्यांच्या आगामी मोटो जी 100 स्मार्टफोनबद्दल एक टीझर व्हिडिओ पोस्ट केला होता. Moto G100 स्मार्टफोन बाजारात लाँचिंगसाठी सज्ज झाला आहे.

Moto G100 चे संभावित स्पेसिफिकेशन्स

Moto G100 स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुल एचडी + डिस्प्लेसह सादर केला जाईल. ज्यामध्ये 1080×2520 पिक्सल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. या व्यतिरिक्त फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 (octa-core Qualcomm Snapdragon 870) दिला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेजच्या दोन व्हेरिएंट्समध्ये येईल. यासह, फोनमध्ये 1 टीबी पर्यंत microSD कार्ड सपोर्ट मिळेल. हा फोन अँड्रॉयड 11 वर चालेल आणि त्याच्या साईडला फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल.

दुसरीकडे, या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास त्याला क्वाड-रियर कॅमेरा सेटअप आणि 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल तसेच सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. हा स्मार्टफोन स्प्लॅश रेझिस्टंट कोटिंगसह येईल आणि यामध्ये 20W टर्बोचार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

67th National Film Awards | सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार

…तर आणखीन कडक निर्बंध लावणार; महापौरांचा पुणेकरांना इशारा