संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या शिवजयंती निमित्त ठाण्यात तब्बल 50 हजार पणत्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट साकारण्यात आले आहे. कलाकार चेतन राऊत याने आपल्या सहकाऱ्यासह मिळून ही कलाकृती बनवली आहे. या कलाकृती उद्यापासून प्रदर्शन ही असणार आहे.
ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात कलाकार चेतन राऊत याने भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोट्रेट बनवले आहे. सकल मराठा संस्थेमार्फत हे भव्य पोट्रेट बनवले गेले. या पोट्रेटसाठी त्यांने हिरवा, काळा, निळा, लाल, पांढरा आणि पिवळ्या अशा रंगाचे 50 हजार पणत्यांचा वापर करण्यात आला. 30 फुट बाय 40 फुटांचे हे पोट्रेट बनवले गेले आहे. हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी ४८ तासाचा कालावधी लागला.
सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून नागरिकांना हे पोट्रेट पाहायला मिळणार आहे. 18, 19 आणि 20 फेब्रुवारी हे पुढील तीन दिवस हे पोट्रेट पाहण्याचा आनंद नागरिक लुटू शकतात.दरम्यान हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी चेतन राऊत सोबत सुरेखा राऊत, सिद्धेश रबसे, कुणाल घाडगे, मयूर अंधेर, प्रमिला जंगले, पूजा लहाने, निशिकांत राऊत, निशांत गावित, सिद्धी गावित, निशिता पाटील यांनी ही मदत केली.
Comments
Loading…