राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. दिवसभरात 35 हजार 952 नवे रुग्ण आढळले. तसेच मृतांचा आकडाही शंभरच्या पुढे गेला आहे. त्यामुळे चिंतेत दिवसागणिक भर पडत चालली आहे.
राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत 1,88,78,754 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 26,00,833 नमुने (13.78 टक्के ) पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होमक्वारंटाइन तर, 13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 37 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.78 टक्के एवढे झाले आहे. दिवसभरात राज्यात 111 रूग्णांचा मृत्यू झाला राज्यातील मृत्यूदर 2.7 टक्के एवढा आहे.
Comments
Loading…