in ,

Corona Vaccination : 56 लाखांहून अधिक नागरिकांना दिली कोरोनाप्रतिबंधक लस

लोकशाही न्यूज नेटवर्क

केवळ 22 दिवसांत 50 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करणारा भारत हा सर्वात वेगवान देश ठरला आहे. देशातील 13 राज्यांमध्ये 60 टक्क्यांहून अधिक तर, 12 राज्यांमध्ये 40 टक्क्यांहून कमी लसीकरण झाले.

आज (6 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 56 लाख 36 हजार 868 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यापैकी 52 लाख 66 हजार 175 आरोग्य कर्मचारी आहेत. तर, यातील 54.7 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी को-विन अॅपद्वारे नोंदणी केली होती, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी दिली.

देशामध्ये 13 राज्यांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. बिहारमध्ये 76.6 टक्के, मध्य प्रदेश 76.1 टक्के, त्रिपुरा 76 टक्के, उत्तराखंड 71.5 टक्के, मिझोराम 69.7 टक्के, उत्तर प्रदेश 69 टक्के, केरळ 68.1 टक्के, ओडिशा 67.6 टक्के, राजस्थान 67.3 टक्के, हिमाचल प्रदेश 66.8 टक्के, लक्षद्वीप 64.5 टक्के, अंदमान 62.9 टक्के आणि छत्तीसगढमध्ये 60.5 टक्के लसीकरण झाले, असेही मनोहर अग्नानी म्हणाले.

तर, देशातील 12 राज्यांमध्ये 40 टक्क्यांहून कमी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. आसाम 39.9 टक्के, दिल्ली 37.1 टक्के, पंजाब 33.7 टक्के, जम्मू काश्मीर 33.6 टक्के, दादरा आणि नगरहवेली 31.9 टक्के, लडाख 31.7 टक्के, तामिळनाडू 28 टक्के, चंदिगढ 27.7 टक्के, मेघालय 21.7 टक्के, नागालॅण्ड 21 टक्के, मणिपूर 17.4 टक्के आणि पुदुचेरीमध्ये 13.6 टक्के लसीकरण झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशभरात चक्काजामला मोठा प्रतिसाद; शांततेत आंदोलन यशस्वी

नौदल सैनिकाचे अपहरण करून जाळले…