राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मागील २४ तासांमध्ये 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सलग वाढत असलेल्या या कोरोना रुग्णांमुळे लॉकडाऊनचे संकट घोघावत आहे.
राज्यात आज 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 17 लाख 89 हजार 800 इतकी झाली आहे. तसेच मागील चोवीस 4 हजार 86 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 16 लाख 58 हजार 879 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.69 टक्के इतका झाला आहे.
राज्यात आज 30 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा 2.61 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Comments
0 comments