in

केरळमध्ये येत्या २४ तासांत मान्सून दाखल होणार

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मान्सून येत्या २४ तासांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. सध्या अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून श्रीलंकेतच अडकून पडलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण असून येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल.

मान्सूनच्या आगमनासाठी हवामानात अनुकुल बदल झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज दुपारपासूनच पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईतही दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी काही भागात पावसाला सुरूवात झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पावसाळी अधिवेशन २०२१ ; सात जुलैपासून राज्यात अधिवेशनाला सुरुवात

वाढदिवसाच्या दिवशी का ट्रोल होतेय सोनाक्षी सिन्हा?