in

Monsoon Updates;मुंबई, ठाणे, पालघरात मुसळधार पावसाची शक्यता

Share

मुंबईत पावसाला सुरुवात तर झाली आहे, मात्र अद्याप हवातसा पाऊस झाला नाही आहे. मात्र आता मुंबईकरांची हि इच्छा पूर्ण होणार आहे. कारण या आठवड्याच्या अखेरीपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2-3 जून रोजी कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल रात्री मुंबईसह उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असल्याची माहिती देखील के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नालासोपारात नंग्या तलवारी घेऊन गावगुंडांचा हैदोस

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान काळाच्या पडद्याआड