in

अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेसह महिलांनी दिला चोप

गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीतीत नव्याने तयार झालेल्या रिम्स हास्पिटलमधील सुरक्षा कंत्राटदाराच्या अनेक तक्रारी महिला कामगारांकडून येत होत्या. पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते.

ड्रेसचे मोजमाप घेण्याच्या नावाखाली महिलांना स्पर्श करणे आणि विरोध करणाऱ्या महिलांना तक्रार केली म्हणून कामावरून काढून टाकणे, तसेचत्यांच्या पगार आणि पीएफ न भरणे असा प्रकार सुरू होता.

सदर कामावरून काढलेल्या महिलांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडे तक्रार करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदारास भर रस्त्यात चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या सुपूर्द केला. यावेळी महिलांना सदर कंत्राटदारास पोलीस ठाण्यात नेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हरणबारी धरण ‘ओव्हर फ्लो ‘…शेतकऱ्यांना दिलासा

शरद पवार गहिवरले… गणपतराव देशमुखांच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन