in ,

शनिवारी मोदींच्या हस्ते लसीकरण मोहीम

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सर्वांना प्रतिक्षा होती ती म्हणजे कोरोनाच्या लसीची. सीरम इन्स्टिट्यूटने मंगळवारी पुण्याहून देशातील विविध ठिकाणांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. असे मोदी यांनी नुकतेच सांगितले होते.

यासोबतच जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम भारत राबविणार आहे. सध्या कोरोना लसीच्या ५४.७२ लाख डोसचा साठा केंद्र सरकारकडे असून, गुरुवारपर्यंत या डोसची संख्या १.६५ कोटीपर्यंत जाईल असे सूत्रांचे सांगणे आहे. ५० वर्षे वयावरील व ५० वर्षे वयाखालील व्याधीग्रस्त लोकांना ही कोरोनाची लस दिली जाईल. लसीकरणासाठी काही हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून केंद्रशासित प्रदेशात कोरोना लसीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’चे तर ५५ लाख डोस भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीचे असणार आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, कोवॅक्सिन, कोविशिल्डप्रमाणेच देशात आणखी काही कोरोना लसींवर संशोधन सुरू असून त्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आल्यानंतर केंद्र सरकार त्या लसींबाबत काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोव्हिशिल्ड लस नागपुरात दाखल

अन्नदाता गेल्याची नाही, तर ट्रॅक्टर रॅलीची यांना लाज वाटतेय – राहुल गांधी