in

‘मोदीचं बजेट भांडवलदार मित्रांसाठीच, शेतकरी मात्र उपेक्षित…’

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनावरून काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरदार शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलसाठीही जास्त पैसे द्यावे लागणार असा आरोप करत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. मोदीचं बजेट हे भांडवलदार मित्रांसाठीच आहे यामध्ये शेतकरी मात्र उपेक्षित राहणार आहे असा टोला देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर लगावला आहे.

जे काही चालले आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. शेतकरी शत्रू आहे का? शेतकरी देशाची शक्ती आहे. त्यांना दाबायचं, मारायचं आणि धमकी द्यायचं हे केंद्र सरकारचे काम नाही. सरकारचे काम शेतकऱ्यांशी चर्चा करणे असून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्याचे काम आहे. पण आज जे काही चालले आहे ते शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या हिताचं नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भारताच्या संरक्षण दलांसाठी पुरेशा निधींची तरतूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील 99 टक्के जनतेच्या हिताचा नाही तर फक्त एक टक्के नागरिक असलेल्या दहा ते पंधरा उद्योगपतींसाठी तयार करण्यात आला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

कायदे नेमके बनले कुठे?

दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली, त्यापैकी एक नरेंद्र सिंह तोमर जी एक चांगली व्यक्ती आहेत पण त्यांना शेतीबद्दल काहीच माहिती नाही. आणि दुसरे म्हणजे पीयूष गोयल कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रवक्ते आहेत. माझ्या मते शेती कायदे मुंबईत तयार झालेत दिल्लीत नव्हे असे म्हणत कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सरकारवर निशाना साधला आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्रातील १३ खात्यांमध्ये सनदी अधिकाऱ्यांचा ‘समांतर प्रवेश’

फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्याच्या बहाण्याने केलं ‘पॉर्न शूट’..अभिनेता ताब्यात