in ,

“नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य, समृद्धी घेऊन येवो”; मोदींच्या शुभेच्छा

शारदीय नवरात्राला म्हणजेच दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव ९ दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक व्हिडिओही शेअर केला आहे.

“सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येणारे दिवस जगत जननी मातेच्या पूजेसाठी स्वतःला समर्पित करणार आहोत. नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुसऱ्या एक ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी देवी शैलपुत्रीच्या प्रार्थनेचा एक व्हिडिओ शेअर केला असून, नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही देवी शैलपुत्रीला प्रार्थना करतो. ही स्तुती समर्पित करतो,” असे म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तरूणीने साकारली दुर्गा देवीची थ्री डि रांगोळी

मुसळधार पावसामुळे बेळगावात भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू