लोकशाही न्यूज नेटवर्क
दोन वर्षापूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. याच पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केले. ते चेन्नई येथील एका कार्यक्रमाला संबोधित करत होते.
यावेळी ” दोन वर्षापूर्वी याच दिवशी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. हा दिवस संपूर्ण भारत कधीच विसरू शकणार नाही, आम्ही सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो,आम्हाला जवानांचा अभिमान आहे, त्यांच्या शौर्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामामधील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुलवामा हल्ला बद्दल
पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने विस्फोटकाने भरलेली कार जवानांच्या ताफ्याला नेऊन धडकवली. या स्फोटामध्ये ४० जवान शहीद झाले होते.
पुलवामावर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर म्हणजे २६ फेब्रुवारीला भारतीय एअर फोर्सने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईल केला आणि दहशतवाद्यांचे अनेक ठिकाणे उद्धवस्त केले. भारताच्या ४० जवानांच्या बदल्यात एअर फोर्सने जवळपास ३०० पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारताने याचा बदला घेतला असला, तरी देशाच्या जवानांचे बलिदान देश विसरु शकणार नाही.
Comments
Loading…