खासदारांचा विकासनिधी कापत मोदी सरकार स्वतःच्या नावाची पार्लमेंटची नवी इमारत बांधत आहे. त्यामुळे मतदार संघातील विकास महत्वाचा कि आठशे हजार कोटींची वास्तु असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला विचारला आहे. अंबरनाथच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्या त्या बोलत होत्या. यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते.
मोदी सरकार असंवेदनशील असून या सरकारने कोविडचे कारण देत प्रत्येक खासदारांचा अडीच वर्षाचा निधी कापला, त्याचे आम्हाला वाईट वाटले नाही मात्र आमच्या मतदार संघातील विकास निधी कापून स्वत:च्या नावाची पार्लमेंटची नवी इमारत ते बांधत आहेत याचे आम्हाला वाईट वाटत अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
भाजपामधून आलेल्यानाच फक्त पक्षात प्रवेश द्या ताटातुन वाटीत आणि वाटितुन ताटात असे करू नका. आघाड़ीधर्म पाळत आपल्या मित्र पक्षातील उमेदवार घेऊ नका अशी सूचना ही त्यांनी कार्यकर्त्याना केली. महाविकास अघाडीचे काम अत्यंत चांगले सुरु असून त्यांची चिंता करण्याची गरज नाही असा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच ईडीची नोटिस आणि पावसातील सभा यामुळे राष्ट्रवादी सत्तेत आल्याची कबुलीही सुप्रिया सुळे यांनी दिली.
Comments
Loading…