लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी शुक्रवारी राज्य सभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रामाणिकच व्यक्ती होते. परंतु त्यांच्या खाली काम करत असलेल्यानी कदाचितच असा कोणता विभाग सोडला ज्यात घोटाळा झाला नाही. आज सात वर्षांच्या मोदी सरकारच्या कालावधीत सात पैशांचाही घोटाळा झाला नाही. हे प्रामाणिक सरकार असतं,” असं म्हणत डॉ. मनमोहन सिंगसारखेच मोदी सरकार प्रमाणिक आहे असा दावा खुद्द अनुराग ठाकुर यांनी केला आहे.
“आज व्याजदर कमी होत आहेत अनेक सुविधा मिळत आहेत. यामुळे सामान्य व्यक्तींना गरीबांना घरं मिळत आहेत. मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल,” असा विश्वासही ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला. आज स्मार्टफोन्सचा सर्वात मोठा उत्पादक गेश म्हणून भारत पुढे आला आहे. देशात सात मोठे टेक्सटाईल पार्क उभारले जाणार आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी देशातील अनेक तज्ज्ञांशी चर्चा आणि सल्ले घेण्यात आले. यापूर्वी देशात पीपीई किट तयार होत नव्हते. परंतु आज ते आपण अन्य देशांना देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Comments
Loading…