in

मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जान कुमारला मनसेचा इशारा

Share

कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे. यावर मनसेनं त्याला चांगलाच इशारा दिला आहे.

“यापुढे जो कुणी मुंबईत महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करेल त्याला विनंती, निवदेन अशी भाषा न करत थेट भर रस्त्यात थोबडवण्यात येईल. याप्रकरणी कोणाला आमच्यावर काय कारवाई करायची ते करा,” असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

“बिग बॉस या शोला काही टीआरपी नाही किंवा हा शो कोणी जास्त बघत नाही. त्यामुळे काही खुसपट काढायची आणि त्या माध्यामातून कशाप्रकारे प्रसिद्धी मिळेल अशा गोष्टी करुन घ्यायच्या. हे चॅनलला एडिट करता आलं असतं. पण हे मुद्दाम केलं आहे. जेणेकरुन त्यांची एक बातमी होईल आणि त्याचे प्रोमो चालतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मराठी भाषेचा मुंबईत महाराष्ट्रात येऊन अपमान कराल,” असेही अमेय खोपकर म्हणाले.

“कुमार सानू हे ज्येष्ठ गायक, संगीतकार आहे. त्यांचा मी नक्की आदर करतो. पण ते गाणं शिकता शिकता मुलावर संस्कार करायला विसरले,” असा टोलाही त्यांनी लगावला.

“पण कुमार सानू यांचा मुलगा याचं काय करायचं, याला कशी मराठीची चिड येते, ते त्याला नक्की दाखवू. पण जर 24 तासाच्या आत बिग बॉसने किंवा कलर्सने माफी मागितली नाही, तर बिग बॉसचं गोरेगावमधील शूटींग होऊ देणार नाही, याला धमकी किंवा इशारा काय समजायचे ते समजा. पण त्या सेटचं काय होईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यायची,” असेही अमेय खोपकर म्हणाले.

“मुंबईत राहून मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. तुमच्या टीआरपीसाठी मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. मला पत्र लिहून माफी न मागता बिग बॉसच्या शोमध्ये माफी मागा तर मुंबईत बिग बॉसचे शूटींग होणार नाही,” असेही अमेय खोपकरांनी सांगितले.

बिग-बॉसमध्ये नेमकं काय घडलं?

बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे.राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

हवाई दलात आणखी 16 राफेल विमानं होणार दाखल

शरद पवारांचा नाशिक दौरा ; मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना घरातच केलं स्थानबद्ध