in

अमरावती महानगरपालिकेत मनसेची लाथाबुक्क्यांनी तोडफोड आंदोलन

सुरज दहाट । अमरावती मनपा प्रशासनातील अस्वच्छता व भोंगळ कारभाराबाबत मनसे आक्रमक झाली असून महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत उग्र आंदोलन करण्यात आले. मनपा आयुक्तांच्या दालनाच्या प्रवेशद्वाराची लाथाबुक्क्यांनी तोडफोड करण्यात आली तसेच मनपा प्रशासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसापासून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असून महापालिका प्रशासनाचे स्वच्छता,साफसफाई अशा गंभीर विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असून शहरात अनेक रोगराईच्या समस्या वाढत आहे. परंतु कुठलेही सकारात्मक पाऊल मनपाच्या वतीने उचलण्यात येत नसल्याने यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज चांगलीच आक्रमक झाले असून आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले परंतु प्रशासनाचा बेजबाबदारपणा बघता मनसेचे पदाधिकारी आक्रमक होऊन आयुक्तांच्या दालनात प्रवेशद्वाराला लाथाबुक्क्यांनी तोडफोड करण्यात आली तसेच मनपा आयुक्त,आरोग्य अधिकारी व महापौर यांच्याविरुद्ध निषेधाचे नारे देण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उस्मानाबादमध्ये टेस्टींग वाढविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Pune Metro | अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली पुणे ट्रायल रन