in

मराठी भाषेवरुन मनसे पुन्हा आक्रमक

Raj Thackeray. (File Photo: IANS)

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी भाषेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आक्रमक होते. आता पुन्हा मराठी भाषेवरून मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावरील एका कर्मचाऱ्याला चोप दिला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत संबंधित व्यक्ती माफी मागताना दिसत आहे .

याप्रकरणाबाबत मनसेचे नवी मुंबईचे पदाधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्हाला आमच्या मनसेच्या नवी मुंबई टीमवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत ती व्यक्ती बोलत होती. तुमच्या राज ठाकरेला सांगा, अशा प्रकारे ती व्यक्ती बोलत होती. राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शंभर पेक्षा जास्त केसेस स्वत:वर घेतल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही. अशाप्रकारे अपमान करणाऱ्यांना चोप दिलाच जाईल. तो परप्रांतीय व्यक्ती आहे. त्याला मराठी शिकवा एवढाच आमचा कार्यकर्ता म्हणाला होता. तर त्या व्यक्तीने उलट उत्तर दिलं”,असं स्पष्टीकरण खांडेकर यांनी दिलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे : शरद पवार

बीडमध्ये अंधश्रद्धेचा कळस…करणीच्या संशयातून चिमुकल्याची हत्या