in ,

मिरा भाईंदरात शहरात १० नव्या रुग्णांची भर; शहरात १८१ जण कोरोनाग्रस्त, ४ रुग्णांचा मृत्यू

Share

ठाणे: मिरा भाईंदर मध्ये आज सोमवारी १० रुग्ण नवीन रुग्ण आढळले. कोरोनाच्या लागण झालेले एकूण १८१ रुग्ण झाले आहेत तर अजून ७७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत तर शहरात ७५ रुग्ण कोरोनाची लागण झालेले रुग्ण आहेत, तर ४ कोरोना बधितांचा मृत्य झाला आहे.  एकाचा आज मृत्यू झाला आहे, तर आज २ रुग्ण बरे झाले आहेत शहरात एकूण शतकभर रुग्ण आजवर बरे आले आहेत, नवीन रुग्णामध्ये ८ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे.

नवीन रुग्णामध्ये मिरारोड येथील रॉयल पार्क, एम.आय.डि. सी. येथील २५ वर्षीय महिला रुग्ण आहे, तर भाईंदर पूर्व येथील न्यु गोल्डन नेस्ट, फेस-८ मध्ये ५२ वर्षीय रुग्ण आहे, कस्तुरी पार्क, नवघर रोड येथील ५५ वर्षीय पुरुष आहे, न्यु गोल्डन नेस्ट, फेस-७ येथील ५४ वर्षीय रुग्ण आहे, नवघर रोड पोलीस स्टेशन येथील २८ वर्षीय रुग्ण आहे, खारीगाव, जय आंबे माता मंदिर येथील ६५ वर्षीय पुरुष आहे, आय.डि.एल. पार्क, ऑरेंज हॉस्पिटल येथील ४३ वर्षीय महिला रुग्ण आहे, सिद्धिविनायक हॉस्पिटल लेन, नवघर रोड येथील ४४ वर्षीय पुरुष रुग्ण आहे तर भाईंदर पश्चिमेच्या जे.पी. ठाकूर मार्ग येथील ३७ वर्षीय पुरुष रुग्ण आहे तर मोदी पटेल रोड येथील ४६ वर्षीय रुग्णांचा समावेश आहे, हे नवीन रुग्ण आहे ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे यात २ रुग्ण हे कोरोना पेशंटच्या संपर्कात आल्याने झालेला आहे तर ८ जण हे नव्याने आढळून आले आहेत.

मिरा भाईंदरचे कोरोनाग्रस्त नवीन १० रुग्ण आढळले आहेत, पालिकेकडून कळवीन्यात आलेल्या अहवालातून नवीन १० रुग्ण आढळले आहेत तर आज दोन रुग्ण बरे झाले आहेत व आनंदाची बातमी म्हणजे आतापर्यंत १०२ रुग्ण बरे झाले आहेत, मीरा भार्इंदर महापालिकेच्या आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज ३ मे रोजी सोमवारी जारी केलेल्या आकडेवारी नुसार कोरोना रुग्णांची संख्या १८१ आहे, त्यापैकी १०२ रुग्ण हे बरे झाले आहेत तर चौघांचा मृत्यू झाला आहे, आता शहरात सध्याच्याला कोरोना बाधित रुग्ण ७५ आहेत व त्यांना कोरोनाची लागण झालेले रुग्ण कार्यरत आहेत तर चाचणीचे तब्बल ७७ जनांचा अहवाल प्रलंबित आहे तर आतापर्यंत ८७५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज शतक पूर्ण झाले आहे १०२ कोरोना  रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, तर ४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

महापालिकेने सोमवारी ४ मे पर्यंतची कोरोनाची आकडेवारी देताना शहरात पडताळणी केलेल्या एकुण १७१५ जणांमधील ५९ जण नव्याने आढळुन आलेले आहेत. तर ११३३ जणांची स्वब (SWAB TEST) टेस्ट घेण्यात आलेली आहे. ७७ जनांचा अहवाल अजुन आलेला नाही तो प्रलंबित आहे तर आतापर्यंत १०२ एक शतक कोरोनाबधित रुग्ण बरे झाले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहाणार १००० बेडचे रुग्णालय, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबईत आज कोरोनाचे नवीन ५१० रुग्ण, तर १७ मे पर्यंत शहरात संचारबंदी लागू