in

ज्योतिरादित्य शिंदे यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; म्हणाले…

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हवाई वाहतूक क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. येत्या चार ते पाच वर्षांत देशभरातील विमानतळांचे विस्तारीकरण आणि विकास करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ, नागालॅंड आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील हवाई वाहतूक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी स्वतःहून लक्ष देण्याची आणि आवश्यक तिथे हस्तक्षेप करण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिंदे यांनी राज्यभरातील विमानतळांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. अकोला विमानतळाची धावपट्टी आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २३४.२१ एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १४९.९५ एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे सुपुर्द करण्यात आली असून, उर्वरित ८४.२६ एकर जागेची पूर्तता अद्याप झालेली नाही.

औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी आणि त्याला समांतर असा टॅक्सी ट्रॅक तयार करण्यासाठी १८२ एकर जमिनीची गरज आहे. तरच हे विमानतळ कोड ‘ई’ प्रकारातील विमानांच्या प्रचलनासाठी योग्य ठरेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘राहुल यांना काळी टोपी संघाचीच वाटते’

अकोलेत टोमॅटो उत्पादकांच्या प्रश्नांबाबत आंदोलन; टोमॅटो फेकून सरकारचा निषेध