in ,

दूध मिळणार पण १ मिटरच्या अंतरानं, जोधपुरच्या दूधवाल्याचा ‘हा’ भन्नाट फॉर्म्यूला

Share

जोधपूर: कोरोनाच्या काळात दूध संकलीत करुन ते घरोघरी पोहोचवणंही जिकरीचं काम झालंय. अनेक दूधवाल्यांना कोरोनाची लागण झाल्याच्याही बातम्याही पाहायला मिळाल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि लोकांना दूधही मिळावं यासाठी जोधपुरच्या संजय नावाच्या दूध विक्रेत्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. लोकांना दूध वाटप करताना सोशल डिस्सिंग पाळलं जावं यासाठी संजयने चक्क एक मिटर म्हणजेच जवळपास साडेतीन फूटांचा पाईप लावलाय. या पाईपद्वारो संजय लोकांना दूधाचं वाटप करतो.

या पाईपच्या एका टोकाला नरसाळ्यासारख्या आकाराची एक तोटी लावलीय. तिथनं लोकांना हवं तितकं दूध सोडलं जातं दुस-याबाजुला ज्याला दूध हवंय त्याचं भांडं असतं. अशा प्रकारे दूधाचं आदानप्रदान होतं आणि सोशल डिस्टंसिंगही पाळलं जातं. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपापली काळजी घेणं गरजेचं आहे मात्र काळजी घेऊन कशाप्रकारे लोकसेवा केली जाऊ शकते याचं उदाहरण संजय यांनी दिलंय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नाशकात नामको हॉस्पिटलमध्ये बिबट्याची एन्ट्री

युद्ध कोरोनाविरुद्धच्या लढयासाठी दिल्ली सरकारकडून ट्विटर हॅंडल