in

दूध आंदोलक मुख्यमंत्र्यांना पाठवणार 5 लाख पत्र…

39 thousand 287 unemployed got employment in Corona
39 thousand 287 unemployed got employment in Corona
Share

राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीकडून सरकार विरोधातील दूध आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादक शेतकरी आणि महायुतीकडून पाच लाख पत्रे पाठवण्यात येणार असल्याचे माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं आहे, ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीसाठी महायुतीकडून आंदोलन पुकारण्यात होतं आणि या मागणीसाठी एक ऑगस्ट रोजी राज्यभर सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र सरकारकडून मागण्या बाबतीत कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याने आता तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये सरकारवर टीका करताना महायुतीच्या दूध आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे.

सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी दुसरा टप्पा म्हणून 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान राज्यातले दूध उत्पादक शेतकरी महायुतीचे कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल पाच लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून हे संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्यात येणार असून किमान यानंतर तरी मुख्यमंत्री दूध उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याबरोबर सरकारने यापुढेही जाऊन दखल घेतली नाही, तर पुढच्या टप्प्यात कोणत्याही नियमांचे पालन न करता शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी सरकारला दिला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Leopards seized from Chandgiri Shivara of Nashik

नाशिकच्या चांदगिरी शिवारातून बिबट्या जेरबंद

मरण्याआधीच घरच्यांनी खोदला वडीलांचा खड्डा