in

MeToo: एम.जे. अकबर यांना न्यायालयाचा झटका

माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांना उच्च न्यायालयात मोठा झटका दिला आहे.मानहानी प्रकरणात प्रिया रमाणी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने त्यांना हा झटका बसला आहे.

एम.जे. अकबर यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला होता. या दाव्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

दिल्लीतील ‘राऊज एव्हेन्यू’च्या विशेष न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी केली. याच प्रकरणात निकाल देताना दिल्ली न्यायालयानं एम जे अकबर यांचे आरोप फेटाळताना प्रिया रमानी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवण्यास नकार दिलाय.

सुनावणीवेळी दिल्ली हायकोर्टाने प्रिया रमाणी यांची निर्दोष मुक्तता करत, कितीही दशकं झाली तरीही महिलांना आपली तक्रार मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे महत्वपूर्ण मत नोंदवले.

प्रकरण काय?

२०१८ साली सुरू झालेल्या ‘मी टू’ या ऑनलाईन चळवळी दरम्यान पत्रकार प्रिया रमानी यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यामुळे एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. यामुळे चिडलेल्या अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG: शेवटच्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर

पुणेकरांनो 10 रुपयांत एसीमधून दिवसभर फिरा, पण पीएमपीएमएलकडे बस आल्यानंतर!