in

मेळघाटातील RFO दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येपूर्वी तिने चार पाणाची सुसाईड नोटही लिहली होती. या प्रकरणी आता धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी काल सायंकाळी साडे सात वाजता स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दिपालीने आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने चार पाणाची सुसाईड नोटही लिहली आहे.

सुसाईड नोटमध्ये दीपालीने वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्यासमोर अश्लील शिवीगाळ करतात. रात्री बेरात्री भेटायला बोलावतात त्यांची मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप तिने केले आहेत.

या घटनेनंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार वर RFO दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच DFO विनोद शिवकुमार रात्रीपासून फरार झाले आहेत. त्यामुळे शिवकुमारच्या अटकेसाठी पोलिसांची नाकेबंदी केली आहे. नागपूर विमानतळावर सुद्धा पोलिस बंदोबस्त लावला आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bharat Bandh; कृषी कायद्यांच्या विरोधात ‘भारत बंद’ची हाक; शेतकऱ्यांनी केली गाजीपूर सीमा बंद

भाजपा आमदार गणेश नाईकांच्या नातवाला मारहाण