देशातील अनेक राज्यात कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. त्या र्श्वभूमीवर कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली तर दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी नेमके काय निर्णय घ्यावेत यावर बैठकीत चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. असंख्य जिल्ह्यात संचारबंदी, लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती ओढवली आहे. यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कोरोना रुग्णांची वाढ, लॉकडाऊन या सर्व विषयावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेअती काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. देशातील केरला,महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू आहे.
Comments
Loading…