मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात व्यस्त असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे बंधू सुनिल कदम यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज (शनिवारी) सकाळी मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खुद्द महापौर किशोरी पेडणेकर या स्वत: होम क्वारंटाईन झाल्या होत्या. घरातूनच त्यांनी आपल्या सगळ्या कामाची अपडेट घेण्यास सुरूवात केली होती, त्यानंतर 14 दिवस घरात राहून पुन्हा त्या कामासाठी अॅक्टिव्ह झाल्या होत्या.
कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. सुरूवातील कमी लक्षणे असताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीचे रिपोर्ट पॉझइटीव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुनिल कदम यांची चाचणी पॉझिटीव्ह येताच त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि घरच्यांचीही स्वॅब टेस्टींग करण्यात आली होती.
Comments
0 comments