in

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर या पाच घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली जाणार आहे. 9 सप्टेंबर 2020 ला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केलीत.

जुलैमध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला कोर्टाने नकार दिला होता. पण, सप्टेंबर महिन्यात अंतरिम आदेशात मात्र आरक्षण या वर्षापुरतं स्थगित करण्यात आलं आहे. 2018 तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कायदा करून मराठा आरक्षण आणलं होतं. त्यानुसार शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे 70 हजार कोंबड्या नष्ट

एकनाथ खडसे यांना 17 फेब्रुवारीपर्यंत दिलासा