राज्यात कोरोनाचे संकट असतानाच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघात गेली 65 दिवस मराठा आरक्षणासाठी अंदोलन सुरू आहे. याचा पार्श्वभूमीवर राजेश टोपे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीला गेले आहेत. साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचं मराठा आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 68 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
या प्रकरणी आंदोलकांनी शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर या संदर्भात बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण संबधित प्रश्नवर चर्चा करण्यात आली, यावेळी आरक्षणच्या प्रश्नामधून मार्ग काढण्याचेही आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी ‘कोपर्डी बलात्कार प्रकरणी सरकारी वकील उज्वल निकम यांची तत्काळ नियुक्ती करण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अशी माहिती मुख्य आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकशाही न्यूजला दिली.
मराठा समाजाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात मागील चार दिवसांपासून सुनावणी देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर १०२ व्या घटनादुरुरुस्तीनुसार राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार नसल्याचे मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांच्या या युक्तीवादामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.
Comments
Loading…