in

Maratha Reservation | पुढील सुनावणी १५ मार्च रोजी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणावर अर्धा तासाच्या वर मराठा आरक्षणाबाबत सुनावणी सुरु होती. या सुनवाणीत मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी १५ मार्चला करण्यात येईल असा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ८ ते १८ मार्च असे मराठा आरक्षण सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले होते त्यामुळे आता या वेळापत्रकानुसार सुनावणी होणार नाही आहे. ८ मार्च अर्थात आजपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू झाली. परंतु या मराठा आरक्षणासंदर्भात काही नवीन मुद्दे आल्याने ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे.

या सुनावणीत अशी मागणी करण्यात आली की, मराठा आरक्षण हे राज्यापुरती मर्यादित नाही तर इतर राज्यांनी मराठा आरक्षणात पक्षकार करण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मार्च रोजी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेलं असून त्या राज्यांचा देखील यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून या प्रकरणात आता ज्या राज्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा राज्यांना देखील नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशातील ‘या’ रेल्वे स्थानकांवर महिला राज

विको कंपनीला भीषण आग