in

Maratha Community |’सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा सरकारचा निर्णय

Share

मराठा समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारखी संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर आता ठाकरे सरकारनं ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं मराठा समाजानं स्वागत केलं आहे.

‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता बहाल केल्यामुळे मराठा समाजासाठीच्या योजनांवर निधी खर्च करण्याची मोकळीक मिळणार आहे. तसेच कर्मचारी भरतीही करता येणार आहे. ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर संस्थेच्या कारभारावर सरकारी अधिकाऱ्यांचं नियंत्रण आल्यानं मर्यादा आल्या होत्या. निधीची उपलब्धता, निधीचा विनियोग यासह कर्मचारी भरती, कल्याणकारी योजना अडचणीत आल्या होत्या, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा तसेच खासदार संभाजीराजे यांनी केला होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Navratri Garba : PPE किटपासून विद्यार्थ्यांनी तयार केला अनोखा ड्रेस

NEET Result | ‘नीट’चा निकाल आज होणार जाहीर