in

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसचं पथक चौकशीसाठी मनसुख हिरेन यांच्या घरी गेलं होतं. त्यावेळी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं हिरेन यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, मनसुख हिरेन च्या मुलांना हा गुन्हा दाखल केला आहे.

मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मृतदेह बाहेर काढला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल बांधलेले होते. मनसुख हिरेन हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे खाडीत त्यांचा मृतदेह आढळल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचलं होतं. त्यावेळी हिरेन कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले. आज झालेल्या चौकशीमध्ये हिरेन यांच्या कुटुंबियांनी एटीएसला ही आत्महत्या असू शकत नाही, हा खून असल्याचे सांगितले. एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचं पथक संपूर्ण घटना समजून घेऊन क्राईम सीनही रिक्रिएट करणार आहे. तसेच एटीएसचं पथक संपूर्ण परिसरातील फोटेजही तपासत असून घरातून निघाल्यानंतर मनसुख हिरेन नेमके कुठे गेले, याचा शोध घेण्याचा एटीएसचं पथक प्रयत्न करत आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसच्या तपासातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं ! – विनायक राऊत

औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन