in

MMRDA च्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिसचा वापर अनिवार्य

Share

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिसचा वापर अनिवार्य केला आहे. यामुळे प्राधिकरणाचे कामकाज अधिक गतिमान होणार असून सार्वजनिक प्रकल्पांच्या प्रगतीसह इतर सरकारी एजन्सी व एमएमआरडीएच्या विभागांकडून परवानग्यांना लवकर मंजूऱ्या मिळू शकणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, अतिरिक्त महानगर आयुक्त – १, अतिरिक्त महानगर आयुक्त – २ आणि विभाग प्रमुख यांच्या फायली, प्रस्तावांचे सर्व कामकाज ई-ऑफिसमार्फत सादर केले गेले. ही अंमलबजावणी १५ सप्टेंबरपासून करण्यात आली.

ई-ऑफिसचे कार्यान्वयन एनआयसी मार्फत करण्यात आले आहे. शासनाच्या ६ ऑगस्ट २०१२ आणि ०९ ऑगस्ट २०१२ रोजीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या सुचनांनुसार ही यंत्रणा कार्यान्वित केली गेली. या शासन निर्णयाद्वारे शासकीय विभाग व प्राधिकरणामध्ये ई- ऑफिसची अंमलबजावणी अनिवार्य करण्यात आली आहे. एमएमआरडीएने तांत्रिक सहाय्य आणि ई-ऑफिस प्रयोगाच्या सॉफ्टवेअर देखभालीसाठी एनआयसीएसआयचे (एनआयसीची मनुष्यबळ सेवा संस्था) 5 मनुष्यबळ नियुक्त केले आहे. याद्वारे ई-ऑफिसचे कार्यान्वयन सुलभ, जबाबदार करण्याबरोबरच ई-कारभारास प्रोत्साहीत करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या अगोदर ई-ऑफिसचा वापर हा फक्त लोकल एरिया नेटवर्क वापरणाऱ्या म्हणजेच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच होता.

यासंदर्भात बोलताना एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. आर. ए. राजीव म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत आमचे लक्ष एमएमआरडीएच्या काम चालू असलेल्या सर्व प्रकल्पांची गुणवत्ता वाढवणे आणि ते वेळेत पूर्ण करण्यावर केंद्रीत आहे. लॉकडाऊनच्या काळात एमएमआरडीएच्या आयटी सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, जेणेकरून कामकाजाचा प्रवाह सुनिश्चित आणि गतिमान होऊ शकेल. लॉकडाउनच्या काळात ई-ऑफिसची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण होती. डिजिटल वर्किंगच्या वापरामुळे प्रकल्पांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. प्रकल्प यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता देखील वाढली आहे. “

ते पुढे म्हणाले की, “माझे कार्यालय आता प्रत्यक्षात फायली घेत नाही आणि फक्त ई-फायली स्वीकारतो, यामुळे सर्व विभागांना फाइल्स ऑनलाइन पाठविण्यास प्रवृत्त केले गेले आहे. यामुळे एमएमआरडीएच्या वेगवान निर्णय आणि गतिमान कामकाजाला नक्कीच मदत झाली आहे, असे ते म्हणाले

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

महाराष्ट्राचा सुपूत्र यश देशमुख श्रीनगर हल्ल्यात शहीद

राज्य सहकारी बँक घोटाळा, अजित पवार यांच्यासह 69 जणांना दिलासा