in

तृणमूलच्या खासदाराच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

trunmule MP

अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगवाणारे देवाशीष आचार्य (Devashish Acharya) या तरुणाचा संदिग्ध मृत्यू (Suspected death) झाला आहे. 2015 साली एका व्यक्तीनं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगावली होती.

काही अज्ञात लोकांनी देवाशीष यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर काही तासांतच देवाशीष यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी देवाशीष यांची हत्या (Claim murder) झाली असल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी मृत देवाशीष आचार्य आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवर बाहेर गेले होते. दरम्यान सोनापेट्या टोल प्लाझानजीक असणाऱ्या एका चहाच्या दुकानाजवळ सर्वजण थांबले. याठिकाणी चहा पिल्यानंतर देवाशीष अचानक निघून गेले. यानंतर ते थेट दुसऱ्या दिवशीच गंभीर अवस्थेत सापडले आहेत. काहीजणांनी त्यांना मिदनापुरातील तमलुक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या सर्व प्रकारामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा गोकाक धबधब्याची मनमोहक दृश्य

”ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार”