in

ममता बॅनर्जी यांनी साडीऐवजी बर्मुडा घालावा, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक चर्चेत आहे. ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यात युध्द रंगत आहे. यातच आता भाजपाचे नेते दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जीना टोला लगावला आहे. प्रचार सभेत बोलताना भाजप नेते दिलीप घोष यांची जीभ घसरली आहे. भाजपा नेते दिलीप घोष म्हणाले की,ममता बॅनर्जी साडी नेसतात पण त्यांचा प्लास्टर लावलेला एक पाय दिसतो. हे काय नाटक आहे? मी कधीही कुणाला अशा पद्धतीने साडी नेसलेलं पाहिलं नाही. साडीऐवजी बर्मुडा घालावा म्हणजे प्रत्येकाला (प्लास्टर) अगदी व्यवस्थित दिसेल’, असं विधान दिलीप घोष यांनी केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करत सवाल केला आहे की, ‘भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत ममता दीदीने साडी का नेसली? असा सवाल केला आहे. त्यांनी आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा शॉर्ट परिधान केला पाहिजे, असं घोष यांनी म्हटलं आहे आणि या माकडांना वाटतंय ते बंगाल जिंकतील?’ अशी मोईत्रा यांनी टीका केली आहे. घोष यांच्या या विधानावर पश्चिम बंगालमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. घोष यांच्या या विधानावर टीएमसीने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गाधींची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात

‘फडणवीस रोज पहाटे ४ वाजता राज्यपालांना फोन करतात’….