in ,

कथित हल्ल्यासंदर्भात उर्मिला मातोंडकर म्हणतात, ममता या ‘बंगालची वाघीण’! भाजपा, काँग्रेसची टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यावरून राजकारण रंगले आहे. या हल्ल्याबाबत भाजपासह काँग्रेसने बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ममता बॅनर्जी यांना ‘बंगालची वाघिण’ म्हटले आहे.

बंगालमध्ये नंदीग्राम भागात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. गर्दीत अचानक काही लोकांनी आपल्यावर हल्ला केला. आपल्याला गाडीत ढकलून देत त्यांनी जबरदस्तीनं गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून या कथित हल्ल्यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे.
तर, या घटनेमागे कटकारस्थान आहे तर, सीबीआय, एनआयए, सीआयडी बोलवा किंवा एसआयटी नेमा. ममता बॅनर्जी असे का करीत नाहीत? लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही यामागे षड्यंत्र असल्याचे म्हणत आहात. मग पोलीस, सीसीटीव्ही कुठे आहेत? असा सवाल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
तर, उर्मिला मातोंडकर यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयातील फोटो ट्विटरवर शेअर करत, त्यांना बंगालची वाघिण म्हटले आहे. अशा घटनेने तुमचे खच्चीकरण होणार नाही, ती तुम्हाला आणखी खंबीर करेल. बंगालची वाघिणीचे स्वास्थ्य लवकरात लवकर सुधारेल, अशी इच्छा उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त

उद्या व्यवहार करून घ्या, शनिवारपासून चार दिवस बँका बंद