in

मालेगावमध्ये बकरी ईदवर कोरोनाचं सावट

Share

मालेगावमध्ये बकरी ईदवर कोरोनाचं सावट दिसतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. मशिदींमध्ये गर्दी करण्याऐवजी नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये नमाज पठण केले. अनेकांनी घरातच कुर्बानीचा विधी पूर्ण केला.

नागरिकांनी घरात राहून तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे बंधन पाळत बकरी ईद साजरी केली. मालेगावमधील प्रतिष्ठितांनी नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी नियमांचे पालन करण्याचे तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन केले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोना काळातला सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड

चंद्रपूर: शिवभोजनात सापडल्या अळ्या