in

मालाडमध्ये कोसळली इमारत; 11 जणांचा मृत्यू

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असतानाच बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कारण या इमारती जुन्या आणि जर्जर अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

“आतापर्यंत महिला आणि लहान मुलांसह १५ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवाशी अडकले असण्याची शक्यता आहे. नागरिकांची सुटका करण्यासाठी बचाव पथकाकडून काम सुरु आहे” असे मुंबई ११ झोनचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; राज्य सरकार महामंडळाला ६०० कोटी देणार

कृषी सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात