in

‘मजूर’ आई-वडिलांच्या कष्टाचे ‘मोल’;विद्यार्थिनीने पटकावले 94.40 टक्के

Share

राज्यात दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या दहावीत पास होऊन घवघवीत यश मिळवल्याच्या अनेक प्रसंग आपण एकले असतीलच. असाच एक प्रसंग नागपुरातलाही आहे. आई-वडील मोलमजुरी करून तिला शिकवत होते. या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत सुहानी ढोके या विद्यार्थिनीने दहावीत 94.40 टक्के गुण मिळवले. तिच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

खरतर जिद्द आणि चिकाटी तुमच्या अंगी असेल तर परिस्थिती कशीही असो तुम्ही यश संपादन करतातच हेच सुहानी ढोके या विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे. नागपूरच्या वाठोडा श्रावणनगरात राहणाऱ्या सुहानीचे आईवडील मोलमजुरी करतात.वडील किशोर ढोके हातमजुरी करतात तर कुटुंबाला आर्थिक हातभार लाभावा म्हणून तिची आई विद्या या हॉटेलमध्ये धुणीभांडी करतात. अशा बिकट परिस्थितीत आई वडिलांच्या कष्टांचे चीज करत सुहानीने जिद्दीने अभ्यास करुन मोठं यश मिळवलंय.

सुहानी ढोके हिने दहावित 94.40 टक्के गुण घेत विश्वास माध्यमिक विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. आता या मुलीने दहावी स्टेट बोर्डाच्या उत्तम यश प्राप्त करत कलेक्टर बनण्याच्या दिशेने पाहिले पाऊल ठेवले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

देशात 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ; पाहा आकडेवारी

Zombivali Poster: ‘झोंबिवली’ सिनेमातून मराठीत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अवतरणार झॉम्बी