in ,

कोरोना क्रेंद्रावर मोठा आर्थिक भ्रष्टाचार, प्रविण दरेकरांची चौकशीची मागणी

Share

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अनेक कोरोना केंद्रांवर मोठा आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

नवी मुंबईच्या अनेक कोरोना केंद्रावर टेस्ट न केलेल्या नागरिकांचे देखील खोटे कोरोना रिपोर्ट काढण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी कोरोना केंद्रांवर मोठा आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच दरेकर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच या संदर्भात नवी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेत खोटे कोरोना टेस्ट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या चौकशी अहवालात काय पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पुणे विद्यापीठ 3 डिसेंबरला लावणार फेरनिकाल

असा ‘नटसम्राट’ होणे नाही! पुन्हा झळकणार चित्रपटगृहात