in

येस बँकेच्या सहसंस्थापकाच्या संपत्तीवर मोठी कारवाई, देश-विदेशातली संपत्ती घेतली ताब्यात

Major action on assets of Yes Bank co-founder, confiscation of assets at home and abroad
Major action on assets of Yes Bank co-founder, confiscation of assets at home and abroad
Share

येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्या 1200 कोटींच्या मालमत्तेवर ईडीने पुन्हा कारवाई केली आहे. येस बँकेतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. राणा यांच्या देशातील आणि विदेशातील मालमत्ता जप्त करण्याचं धाडस ईडीनं दाखवलं असल्याने येस बँकचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राणा कपूर यांची मुंबई, लंडन आणि न्यूयॉर्कमधील मालमत्तेवर ईडीने कब्जा मिळवला आहे. त्यामुळे राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यंदा मार्चमध्ये ईडीने मुंबईतून राणा कपूर यांना अटक केली होती. तेव्हापासून जामीन मिळवण्याचे राणा यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु ईडीची सतत कारवाई सुरू राहिल्याने राणा कपूर यांना अजूनही मोकळ्या हवेत श्वास घेता आलेला नाही.

राणा कपूर यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबालाही मोठ्या चौकशीतून जावं लागलं, त्यानंतर राणा कपूर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. राणा कपूर यांची जितकी संपत्ती आहे, ती संपुर्ण ताब्यात घेण्याचे कामही ईडीकडून केलं जात आहे. दिवसेंदिवस राणा यांच्या संपत्तीच्या नव्या चर्चाही समोर येताना दिसत आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Maharashtra Corona Update | 6 thousand 875 new patients in last 24 hours, while ...

Maharashtra Corona Update | गेल्या 24 तासात 6 हजार 875 नवे रुग्ण, तर…

CISCE RESULT 2020; आज लागणार दहावी-बारावीचा निकाल