आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस. महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. कोणत्याही क्षेत्रात त्या पुरुषांपेक्षा कमी नाही. असंच एक वेगळ क्षेत्र म्हणजे ‘रेल्वे’. या क्षेत्रात देखील महिला पुढे आहेत . भारतात आज अनेक रेल्वे स्टेशन्स वर महिला राज असून स्टेशन मास्तर पासून पॉइंटमन पर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिला समर्थपणे सांभाळत आहेत.
भारतातील महवाची रेल्वे स्थानके जिथे महिला राज आहे :
या यादीत मुंबईचे उपनगर असेलेले माटुंगा रेल्वेस्टेशन विशेष महत्वाचे आहे कारण २०१८ मध्ये हे स्टेशन महिला संचालित स्टेशन म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे. २०१७ पासून ४१ महिलांचा चमू या स्टेशनची जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत आहेत.
नागपूरचे अजनी रेल्वे स्टेशन हे सॅटेलाइट रेल्वे स्टेशन मध्य रेल्वे विभागात येते. या स्टेशनची जबाबदारी देखील महिला वर्गाच्या हाती असून येथून रोज ६ हजार प्रवासी प्रवास करतात.
जयपूर मधील गांधीनगर रेल्वेस्टेशन उत्तर पश्चिम रेल्वे विभागात येते. हे महत्वाचे स्टेशन असून येथून रोज ५० रेल्वे जातात त्यातील २५ या स्टेशन वर थांबतात. येथून रोज सरासरी ७ हजार प्रवासी प्रवास करतात. स्टेशन मास्तर पासून पॉइंट मन पर्यंत सर्व कामे ३२ महिला कर्मचारी करतात. या भागात सर्वाधिक गर्दी असते.
गुजरातचे मणीनगर रेल्वे स्टेशन असेच महिलंच्या अखत्यारीत असलेले राज्यातील पाहिले रेल्वे स्टेशन आहे. पश्चिम रेल्वे विभागातील या स्टेशनवर स्टेशन मास्टर पासून रेल्वे सुरक्षा बलातील १० महिलांसह ३६ कर्मचारी आहेत.
आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यातील चंद्रागिरी स्टेशन राज्यातील पाहिले महिला संचालित स्टेशन असून येथे १२ महिला कर्मचारी सर्व जबाबदारी पार पाडतात. याशिवाय तिरुपती, फिरंगीपुरम आणि हैद्राबाद बेगमपेठ रेल्वेस्टेशन सुद्धा महिला सांभाळत आहेत.
Comments
Loading…