in

महेंद्र सिंह धोनीचा व्यवसाय संकटात ; पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या सावटानंतर आता दिवसोंदिवस बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मध्य प्रदेशमध्ये बर्ड फ्लूची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रसाराचा फटका भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीलाही बसला.

धोनीने मागवलेल्या कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांनाही ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला. धोनीने मागवलेल्या अडीच हजार कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लांना बुधवारी झाबुआमध्ये ठार करण्यात येणार आहे. या कोंबड्यांच्या काही पिल्लांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. येथील पोल्ट्रीमधील काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमूने भोपाळमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बर्ड फ्लूमुळेच हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी निवृत्तीनंतर काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. लॉकडाऊनदरम्यान धोनी शेतात मेहनत करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता धोनी कुक्कुटपालनाकडेही वळला. धोनी आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये कडकनाथ कोंबड्या पाळल्या होत्या. रांचीमधील फार्म हाऊसमध्येच त्याने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पाहा विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीचा फोटो

‘या’ नागरिकांना लस देता येणार नाही – राजेश टोपे